Dete Tula Have Te

अपर्ण मयेकर

देते तुला हवे ते देते दहा दिशा रे नेऊ नकोस माझी ही एवढी तृषा रे देते तुला हवे ते देते दहा दिशा रे हे मेघ घेउनी जा जे कोष अमृताचे हा मोर राहु दे तू त्यांचा परि पिसा रे जा चंद्र घेउनी हा मज वाट दावणारा संपेल चांदणीचा अभिसार हा कसा रे देते तुला हवे ते देते दहा दिशा रे घे अंग कांचनाचे घे रंग कुंतलांचे हृदयात या सलू दे दु:खाचिया कुसा रे घे एवढे सभोवती मी राहणार नाही होईन अमर परि मी पिउनी अशा विषा रे देते तुला हवे ते देते दहा दिशा रे नेऊ नकोस माझी ही एवढी तृषा रे देते तुला हवे ते देते दहा दिशा रे

Written by: DUTTA DAVJEKAR, VASANT NINAVELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs