Prem Swarup Aai
उत्तरा केळकर
निरपेक्ष निर्व्याज प्रेम करावं ते आईनं
जगात घडत असलेल्या गोष्टींचे ज्ञान
रिकाम्या असलेल्या बाळाचे मन
साठवून ठेवत असतं पण त्यातले
चांगले वाईट कसे हि जाणीव
सर्व प्रथम त्याला आईच करून देते
आणि म्हणूनच तिचे हे अलौकिक
नाते शब्दांनी सांगता येत नाही
कि अक्षरांमध्ये बांधता येत नाही
तारुण्याचा सागर असणाऱ्या परमेश्वरा नंतर
वात्सल्यसिंधु आईच पूजनीय आहे
आणि म्हणूनच तिच्या विरह दुखणे
आर्त होऊन माधव जुलिअन म्हणतात
प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधु आई
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी
प्रेमस्वरूप आई
नाही जगात झाली आबाळ या जीवाची
नाही जगात झाली आबाळ या जीवाची
तुझी उणीव चित्ती आई तरीहि जाची
चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका
प्रेमस्वरूप आई
ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनाही
वाटे इथूनी जावे तुझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे
प्रेमस्वरूप आई
वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके
वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके
देईल शांतव्हाया हृत्स्पंद मंद झोके
घे जन्म तू फिरूनी येईन मीहि पोटी
खोटी ठरो न देवा हि एक आसं मोठ्ठी
प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधु आई
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी
प्रेमस्वरूप आई आई
Written by: MADHAV JULIAN, VASANT PRABHULyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now