Aata Kasali Chori Ga

Asha Bhosale

त्याची माझी प्रीत अलौकीक त्याची माझी प्रीत अलौकीक दिशा जाणती चारी ग आता कसली चोरी ग आता कसली चोरी ग तो नगरीचा झाला राजा मी म्हणते पण केवळ माझा त्याच्या भवती धरिती फेरा स्वप्‍ने माझी सारी ग आता कसली चोरी ग आता कसली चोरी ग फुलात दिसती त्याचे डोळे सुगंधात सहवास दरवळे स्मरणे त्याच्या घेई लालिमा कांती माझी गोरी ग आता कसली चोरी ग आता कसली चोरी ग वावरता मी त्याच्या मागे पदापदावर सुदैव जागे सप्‍तपदीला विलंब का मग तोरण विलसो दारी ग आता कसली चोरी ग आता कसली चोरी ग

Written by: G D Madgulkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store