Ya Dolyanchi Don Pakhare

Asha Bhosale

या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा सहवासविण नकोच यांना अन्य कोठचा वारा तुमचा परिसर यांस नभांगण घरकुल तुमची छाती पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती सावलीत ही बसतील वेडी प्रीतीच्या दडुनी एका अश्रुमाजी तुमच्या जातील पण बुडूनी नव्हेत डोळे नव्हेत पक्षी ही तर अक्षय नाती पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती

Written by: Davjekar Datta, G D MadgulkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs