Zombati Anga Jallahari

सुमन कल्याणपुर

झोंबती अंगा जललहरी झोंबती अंगा जललहरी आमुची वसने दे श्रीहरी आमुची वसने दे श्रीहरी आमुची वसने दे श्रीहरी पळे पळाली गेली घटका पळे पळाली गेली घटका पुरे खेळ हा अवखळ लटका पुरे खेळ हा अवखळ लटका परत जाऊ दे घरी परत जाऊ दे घरी आमुची वसने दे श्रीहरी जात आमुची अशी लाजरी जात आमुची अशी लाजरी क्षणाक्षणाने पदर सावरी क्षणाक्षणाने पदर सावरी सुवेश असला तरी सुवेश असला तरी आमुची वसने दे श्रीहरी जळात बुडले देह तरी हे जळात बुडले देह तरी हे उघडेपण मन विसरत नाही उघडेपण मन विसरत नाही लाज सले अंतरी लाज सले अंतरी आमुची वसने दे श्रीहरी किती विनवावे किती रडावे किती विनवावे किती रडावे असेच वाटे जळी बुडावे असेच वाटे जळी बुडावे तूच सुबुद्धी धरी तूच सुबुद्धी धरी आमुची वसने दे श्रीहरी

Written by: G D Madgulkar, Snehal BhatkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs