Naam Ahe Adi Anti

सुमन कल्याणपुर

नाम आहे आदि अंती नाम सर्व सार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार नाम आहे आदि अंती नाम सर्व सार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार नामे तरीले पतीत तरीले पाषाण नामे तरीले पतीत तरीले पाषाण नामे कोळीयासी दिधले मुनीपद जाण नाम जाळी संचिताचा पूर्व बडिवार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार नाममय झाला चोखा ब्रह्मी लीन झाला अजामेळ पापराशी वैकुंठासी गेला तेथे उभे पंढरीचे घेउनी आकार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार नाम जपो वाचा नित्य श्वासांतही नाम नाममय होवो देवा माझे नित्य कर्म नामाच्याचसंगे लाभो प्रेम रे अपार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार नाम आहे आदि अंती नाम सर्व सार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार

Written by: अशोकजी परांजपेLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs