Sansar Mandiri Ya

सुमन कल्याणपुर

संसार मंदिरी या आता उणे न काही आनंद नाचतो ग आनंद गीत गाई आता उणे न काही संसार मंदिरी या झाले सुवासिनी मी हातात राज्य आले गृहिणीपदावरी मी सार्‍या सुखात न्हाले ही ठेव वैभवाची नांदे दिशांत दाही आनंद नाचतो ग आनंद गीत गाई आता उणे न काही संसार मंदिरी या या श्याम मंजिरीचा वृंदावनी पिसारा दारात कर्दळीला झुलवी सुगंध वारा या श्याम मंजिरीचा वृंदावनी पिसारा दारात कर्दळीला झुलवी सुगंध वारा हे झाड अंगणी या रखवालदार राही आनंद नाचतो ग आनंद गीत गाई आता उणे न काही संसार मंदिरी या पतिरूप देव माझा सिंहासनी विराजे गालात हासते मी डोळ्यांत प्रीत लाजे भाग्यास आज माझ्या उपमा सुचे न काही आनंद नाचतो ग आनंद गीत गाई आता उणे न काही संसार मंदिरी या

Written by: Jagdish Khebudkar, Provakar JogLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs