Deepaka Mandile Tula

सुमन कल्याणपुर

दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट जडविला घडविला चंदनाचा पाट घरदार प्रकाशाने भरीं कांठोकांठ दारीं आलेल्याची करूं सोपी पायवाट घातली ताईने तुला रंगांची रांगोळी पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी घाशिली समई मी ही केली तेलवात दह्यात हा कालविला जिरेसाळ भात दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट जडविला घडविला चंदनाचा पाट गा रे राघू गा ग मैने बाळाच्या या ओळी गा रे राघू गा ग मैने बाळाच्या या ओळी मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी कुतू काऊ चिऊ माऊ या रे सारे या रे सांडलेली शिते गोड उचलुनी घ्या रे सांडलेली शिते गोड उचलुनी घ्या रे गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी आयुष्याने थोर करी माये कुलदेवी दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट जडविला घडविला चंदनाचा पाट जडविला घडविला चंदनाचा पाट

Written by: B B Borkar, Kamalakar BhagwatLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs