Dahavis Asati Ka Re

सुमन कल्याणपुर

दहा वीस असती का रे मने उद्धवा दहा वीस असती का रे मने उद्धवा एक मात्र होते ते मी दिले माधवा दिले माधवा दहा वीस असती का रे मने उद्धवा पाच इंद्रियांचा मेळा दास त्या मनाचा तनु-मना एकच माझ्या ध्यास मोहूनाचा ध्यास मोहूनाचा कुणीतरी मेघःश्यामा इथे आणवा इथे आणवा दहा वीस असती का रे मने उद्धवा नसे देव ठावा मजला राव द्वारकेचा नसे देव ठावा मजला राव द्वारकेचा बाळकृष्ण ओळखते मी सखा राधिकेचा फेर धरा यमुनातिरी गोप नाचवा गोप नाचवा दहा वीस असती का रे मने उद्धवा एक स्पर्श व्हावा यावा वास कस्तुरीचा एक हाक द्यावी प्यावा सूर बासरीचा लोचनांस माझ्या यावा पूर आसवा पूर आसवा दहा वीस असती का रे मने उद्धवा

Written by: G D Madgulkar, Snehal BhatkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs