Tuzya Gala Mazya Gala

सुधीर फडके, Asha Bhosale

तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा ताई आणखी कोणाला चल रे दादा चहाटळा तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा तुज कंठी मज अंगठी आणखी गोफ कोणाला तुज कंठी मज अंगठी आणखी गोफ कोणाला वेड लागले दादाला वेड लागले दादाला मला कुणाचे ताईला तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा तुज पगडी मज चिरडी आणखी शेला कोणाला तुज पगडी मज चिरडी आणखी शेला कोणाला दादा सांगू बाबांना दादा सांगू बाबांना सांग तिकडच्या स्वारीला तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा खुसू खुसू गाली हसू वरवर अपुले रुसू रुसू खुसू खुसू गाली हसू वरवर अपुले रुसू रुसू चल निघ येथे नको बसू चल निघ येथे नको बसू घर तर माझे तसू तसू तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा कशी कशी आज अशी गंमत ताईची खाशी कशी कशी आज अशी गंमत ताईची खाशी आता कट्टी फू दादाशी आता कट्टी फू दादाशी तर मग गट्टी कोणाशी तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा

Written by: B R Tambe, Vasant PrabhuLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs