Shani Devachi Aarti

त्यागराज खाडिलकर

जय जय श्री शनीदेवा पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळितो मनोभावे करुनी सेवा जय जय श्री शनीदेवा सुर्यसुता शनिमूर्ती तुझी अगाध कीर्ति एकमुखे काय वर्णू शेषा न चले स्फुर्ती जय जय श्री शनीदेवा नवग्रहांमाजी श्रेष्ठ पराक्रम थोर तुझा ज्यावरी कृपा करिसी होय रंकाचा राजा जय जय श्री शनीदेवा विक्रमासारिखा हो शककरता पुण्यराशी गर्व धरिता शिक्षा केली बहु छळीयेले त्यासी जय जय श्री शनीदेवा शंकराच्या वरदाने गर्व रावणाने केला साडेसाती येता त्यासी समूळ नाशासी नेला जय जय श्री शनीदेवा प्रत्यक्ष गुरुनाथ चमत्कार दावियेला नेऊनि शुळापाशी पुन्हा सन्मान केला जय जय श्री शनीदेवा ऐसे गुण किती गाऊ धणी न पुरे गातां कृपा करि दिनांवरी महाराजा समर्था जय जय जय श्री शनीदेवा दोन्ही कर जोडनियां रुक्मालीन सदा पायी प्रसाद हाची मागे उदय काळ सौख्यदावी जय जय श्री शनीदेवा जय जय श्री शनीदेवा पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळीतो मनोभावे करुनी सेवा जय जय श्री शनीदेवा जय जय श्री शनीदेवा जय जय श्री शनीदेवा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs