Vishrabd Manachya Katarwaili
सुरेश वाडकर
विश्रब्ध मनाच्या कातरवेळी
विश्रब्ध मनाच्या कातरवेळी
एखाद्या प्राणाची दिवेलागण दिवेलागण
सरत्या नभाची सूर्यास्तछाया
सरत्या नभाची सूर्यास्तछाया
एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण बुडून पूर्ण
एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल
विलग पंखांचे मिटत मन
एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल
विलग पंखांचे मिटत मन
एखाद्या प्राणाचे विजनपण
एखाद्या प्राणाचे विजनपण
एखाद्या फुलाचे फेडीत ऋण फेडीत ऋण
गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां
गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां
प्राजक्त चुंबन एखादा प्राण
गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां
प्राजक्त चुंबन एखादा प्राण
तुडुंब जन्मांचे सावळेपण
तुडुंब जन्मांचे सावळेपण
एखाद्या प्राणाची मल्हारधून मल्हारधून
एखाद्या प्राणाचे सनईसूर
एखाद्या मनाचे कोवळे ऊन
एखाद्या प्राणाचे सनईसूर
एखाद्या मनाचे कोवळे ऊन
निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा
निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा
एखाद्या सरणा अहेवपण अहेवपण
विश्रब्ध मनाच्या कातरवेळी
विश्रब्ध मनाच्या कातरवेळी
एखाद्या प्राणाची दिवेलागण दिवेलागण
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now