Gadi Chalali Ghungarachi
प्रल्हाद शिंदे
गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगराची
गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगराची
वेळ कडक नि बाराची वाट बाई डोंगराची
गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगराची
पहिल्यानं गाडीत बसले मी आज
कोकणात आहे माहेर माझं
आईबाप माझं दर्याचं राजं
आईबाप माझं दर्याचं राजं
मला सवय बंदराची वाट बाई डोंगराची
गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगराची
दणक्यावर दणका बसतो ग बाई
दणक्यानं जीव हा व्याकूळ होई
तिकडच्या स्वारीला पर्वाच नाही
तिकडच्या स्वारीला पर्वाच नाही
ह्या भयाण जंगलाची वाट बाई डोंगराची
गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगराची
घरात वागे तशी दारात
रात्रीचा दिस करी दिसाची रात
भारी उताविळ ही पुरुषाची जात
भारी उताविळ ही पुरुषाची जात
आहे लबाड मुलखाची वाट बाई डोंगराची
गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगराची
समोर दिसतंय् आपुलं गाव
कसं वाटं ना तुम्हाला भ्यावं
पुरे पुरे आता भास्करराव
पुरे पुरे आता भास्करराव
ओढाताणी ही पदराची वाट बाई डोंगराची
गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगराची
गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगराची
Written by: Madhukar Pathak, Sahebrao KokateLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now