उठा पांडुरंगा आतां

त्यागराज खाडिलकर, वर्षा भावे, माधुरी, प्रभंजन मराठे, मेघा गोगटे, अनुप जलोटा, मंगला काणे, मेघ गोगटे, शेखर कुंभोजकर

उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां संतसाधुमुनी अवघे झालेती गोळा सोडा सेजसुख आतां पाहुं द्या मुखकमळा उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी मन उतावीळ रूप पाहावया दृष्टी राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया सेजें हालउनि जागे करा देवराया उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां गरुड हनुमंत पुढे पाहती वाट स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs