Ha Khel Sawalyancha

महेंद्र कपूर

रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा हा चंद्र ना स्वयंभू, रवी-तेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा हा चंद्र ना स्वयंभू, रवी-तेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा आभास सावली हा असतो खरा प्रकाश आभास सावली हा असतो खरा प्रकाश जे सत्य भासती ते असती नितांत भास हसतात सावलीला हा दोष आंधळयांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा या साजिर्या क्षणाला का आसवे दिठीत मिटतील सर्व शंका मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत गवसेल सूर अपुल्या या धूंद जीवनाचा हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा

Written by: HRIDAYNATH MANGESHKAR, SUDHIR MOGHELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs