Asata Sameep Doghe

Asha Bhosle, महेंद्र कपूर

असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावे शब्दांविना परंतु बोलून सर्व जावे अतृप्त मीलनाचे विरहातही सुखाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे असता समीप दोघे फसवा वरून राग रुसव्यात गाढ प्रीती हो फसवा वरून राग रुसव्यात गाढ प्रीती होता क्षणिक टूर वेडी मनात भीती दिनरात चिंतनाचे अनिवार कौतुकाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे असता समीप दोघे दूरातही नसावा दोघांमध्ये दुरावा हो दूरातही नसावा दोघांमध्ये दुरावा स्पर्शाविना सुखाने हा जीव मोहरावा ओठी फुलून यावे स्मित गोड सार्थकाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावे शब्दांविना परंतु बोलून सर्व जावे असता समीप दोघे

Written by: N Dutta, Shanta ShelkeLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs