Sumbarana Gaoo Chala
जयवंत कुलकर्णी
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रे
हे हे हे अहा
या शेकोटीच्या उबिला गा रातभर र्हाऊ रे
हे हे हे अहा
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रं
शेकोटीच्या उबिला गा रातभर र्हाऊ रं
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रं
शेकोटीच्या उबिला गा रातभर र्हाऊ रं
भल्याभल्यास्नी सोसंना ही जवानीची आग
काय करामत सांगू हिची लई न्यारी धग
ऋषीमुनी बि पोळलं अशा इश्कबाजी संग
भली भली भुलली गा आ आ आ आ
भली भली भुलली गा कथा त्येची लावू रं
निळोबाच्या नावानं चांग भलं आणि
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रे हे हे हे अहा
या शेकोटीच्या उबिला गा रातभर ऱ्हाऊ रे हे हे हे अहा
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रं
शेकोटीच्या उबिला गा रातभर र्हाऊ रं
विश्वामित्र बसला व्हता भगवंताच्या जपाला बरं
डोळं मिटून ध्यान लावं रानावनात तपाला असं होय
आली मेनका नाचत तिच्या भुलला रूपाला भुलला रूपाला आ आ आ आ
तवाच्या गा येळेचा ह्यो हा हा हा हा
तवाच्या गा येळेचा ह्यो पडताळा दावू रे
निळोबाच्या नावानं चांग भलं आणि
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रे हे हे हे अहा
या शेकोटीच्या उबिला गा रातभर र्हाऊ रे हे हे हे अहा
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रं
शेकोटीच्या उबिला गा रातभर र्हाऊ रं
गौतम ऋषीची होती अहल्या बाईले
अहो असू द्या कि
राजा इंद्रानं तिला डोळं भरून पाहिले
हो रं
पतिरूप घेऊन तिला एकान्ती त्यानं भोगलं त्यानं भोगलं आ आ आ आ
मोठेपणा घसरला हा हा हा हा
मोठेपणा घसरला याद त्याची ठेवू रे
निळोबाच्या नावानं चांग भलं आणि
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रे हे हे हे अहा
या शेकोटीच्या उबिला गा रातभर ऱ्हाऊ रे हे हे हे अहा
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रं
शेकोटीच्या उबिला गा रातभर र्हाऊ रं
असा व्हता पराशर मुनी त्याला दिसली मत्स्यगंधा असं
साधुपणाला झाली गा तिथं कशी मदनाची बाधा बरं
तिला भिजली बगुन तिच्या लागला की नादा लागला की नादा आ आ आ आ
किती किती उदारणं हे हे हे हे
किती किती उदारणं सांगा अशी देवू रे
निळोबाच्या नावानं चांग भलं आणि
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रे हे हे हे अहा
या शेकोटीच्या उबिला गा रातभर ऱ्हाऊ रे हे हे हे अहा
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रं
शेकोटीच्या उबिला गा रातभर र्हाऊ रं
नर-नारीची घातली अशी जल्माची गाठ हं बरोबर आहे कि
किसनदेवाच्या बायका सोळा हजार एकशे आठ आव असू द्या वो
तिच्या शिणगाराचा छंद उभ्या दुनियेला पाठ दुनियेला पाठ आ आ आ आ
पुराणाचा दाखला ह्यो हा हा हा हा हो हो
पुराणाचा दाखला ह्यो कलियुगी घेऊ रे
निळोबाच्या नावानं चांग भलं आणि
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रे हे हे हे अहा
या शेकोटीच्या उबिला गा रातभर ऱ्हाऊ रे हे हे हे अहा
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रे
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रं
या शेकोटीच्या उबिला गा रातभर ऱ्हाऊ रे
शेकोटीच्या उबिला गा रातभर ऱ्हाऊ रं
Written by: Jagdish Khebudkar, Viswanath MoreLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now