Aamcha Raju Ka Rusla
जयवंत कुलकर्णी
रुसु बाई रुसु कोपऱ्यात बसु
आमच्यासंगे बोला आता ढिश्यूं ढिश्यूं ढिश्यूं
हाहा हीही होहो
आता तुमची गट्टी फू
आल बाल बारा वर्ष बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं तोंडाला सुटेल पाणी हं
आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला
आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला
सांगशील का माझ्या कानी आरं सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला राग तुझा कसला
आमचा राजू चू चू चू आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला
गाल गोबरे गोरे गोरे लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी हा चंद्र मुखाचा उदास का दिसला
राग तुझा कसला आमचा राजू अरेरे आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला
बावन पत्ते बांधु वाडा शर्यत खेळू घोडा घोडा घोडा
घरदाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला आमचा राजू बघा हो आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला
चिमणी खाई मोती दाणे गोड कोकिळा गाई गाणे
चिमणी खाई मोती दाणे गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा अबोल का बसला
राग तुझा कसला आमचा राजू सोनूला आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला
Written by: Jagdish Khebudkar, Sudhir PhadkeLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now