Ha Unaad Avakhal Vaara

उषा मंगेशकर

हा उनाड अवखळ वारा या टपोर श्रावणधारा हा उनाड अवखळ वारा या टपोर श्रावणधारा फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा हे कुंतल काळे मेघ डोळ्यांत नाचते वीज अंगावर फुलुनी आली ही यौवनातली लाज ही यौवनातली लाज चालीतून माझ्या भरला हरिणीचा नाजूक नखरा फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा हातावरी माझ्या रंगे कोवळ्या कळ्यांची मेंदी हातावरी माझ्या रंगे कोवळ्या कळ्यांची मेंदी सुमगंध सोडुनी भुंगे लागलेत माझ्या नादी लागलेत माझ्या नादी बांधिते अशी पदराशी गंधीत फुलांच्या नजरा फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा बहराच्या हिरव्या रानी परदेशी आला रावा भुलवून जिवाला बाई तो नेई दूरच्या गावा तो नेई दूरच्या गावा मधुबोल तयाचे रुजवी अंगावरी गोड शहारा फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा हा उनाड अवखळ वारा या टपोर श्रावणधारा फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs