Mogara Phulala
सुरेश वाडकर
दंवबिंदूचा आभाळाशी जणू दुवा जुळला
दंवबिंदूचा आभाळाशी जणू दुवा जुळला
क्षितिजावर लालिमा हसली मोगरा फुलला
मोगरा फुलला
नवा नवा भासतो चेहरा आज मला अपुला
हा नजरेचा कौल अनोखा मोगरा फुलला
मोगरा फुलला
घरट्यातून पाखरें उडाली किरणांची रांगोळी सजली
तरुण आशा अन् स्वप्नांनी दिवसांची ओंजळ भरलेली
एक कवडसा असा झळकला
एक कवडसा असा झळकला मोगरा फुलला
हात तुझा हातात गुंफला मोगरा फुलला
मोगरा फुलला
कुठे हे सुखाचे घरटे आहे अवघे जीवन शोधू पाहे
जिथे मनाला मिळे विसावा खरे सूख ते तिथेच आहे
जुनेच घरकुल त्याचा मजला
जुनेच घरकुल त्याचा मजला अर्थ नवा कळला
हाक दिली अन् साद मिळाली मोगरा फुलला
मोगरा फुलला
विणला जावा तनामनाचा नाजूक सुंदर गोफ दुहेरी
जसे चांदण्यावर कोरावे रुणझुणते ऊन हे सोनेरी
जगणे आहे रंगबिरंगी
जगणे आहे रंगबिरंगी इंद्रधनुचा झुला
क्षितिजावर लालिमा हसली मोगरा फुलला
मोगरा फुलला
मोगरा फुलला
मोगरा फुलला
Written by: ASHOK PATKI, CHANDRSHEKHR SANEKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now