भासे जरी क्षणांचा खेळ ही
नकळत निसटते हातातून वेळ ही
हे जगणे आज जणू कठपुतळी
दोर सुटे चाल इथे भरकटलेली
हरवली लहान माझी बाहुली
भवताली सारे बदलून गेले
ऋतू बदलाच्या सारखे
निखळता तारे अंधारून आले
आभाळच झाले पोरखे
जाऊ कुठे काळीज तुटे
वाट नसे पायातली
हरवली लहान माझी बाहुली
नजर कुणाची लागली सुखाला
हुरहूर श्वासांमधली
बहर ओसरला फुलराणीचा
रिकाम्या सुगंधी ओंजळी
शोधू किती वाटे भीती
पापणी हि पाणावले
हरवली लहान माझी बाहुली
हरवली लहान माझी बाहुली
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now