Ramavin Rajyapadi Kon Baisato

सुधीर फडके

रामाने जाऊ नये म्हणून त्यान पोटाशी धरून कौसल्येने कितीही आक्रोश केला तरी रामाचा निश्चय काही बदलला नाही उलट त्यांनी तिला समजावून सांगितलं कि आई ह्या वेळेला तुझं कर्तव्य असं आहे कि पुत्र प्रेम तू बाजूला ठेवावंसं आणि माझ्या वडिलांच्या अत्यंत दुस्साह आणि दारुण अवस्थे मध्ये तू याच ठिकाणी राहावंसं त्यांना धीर द्यावास त्यांचं सांत्वन करावंसं कारण मला हे माहित आहे कि त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे तो पूर्ण पणे स्वतःच्या इच्छे विरुद्ध घेतला आहे आणि ह्याच्या त्यांना काय यातना होत असतील याची मला पूर्णपणे कल्पना आहे पित्याच्या वचनाचं पालन करण हे पुत्र म्हणू माझं कर्तव्यच नव्हे का आई स्थिर डोळ्यांनी हे सर्व पाहत असलेल्या लक्षुमणाला मात्र आता हे सहन होई ना तो संतापून म्हणाला रामाविण राज्यपदीं कोण बैसतो रामाविण राज्यपदीं कोण बैसतो घेउनियां खड्ग करीं मीच पाहतो घेउनियां खड्ग करीं मीच पाहतो रामाविण राज्यपदीं कोण बैसतो श्रीरामा तूं समर्थ मोहजालिं फससि व्यर्थ श्रीरामा तूं समर्थ मोहजालिं फससि व्यर्थ पाप्यांचे पाप तुला उघड सांगतो पाप्यांचे पाप तुला उघड सांगतो रामाविण राज्यपदीं कोण बैसतो वरहि नव्हे वचन नव्हे कैकयिला राज्य हवें वरहि नव्हे वचन नव्हे कैकयिला राज्य हवें विषयधुंद राजा तर तिजसि मानतो विषयधुंद राजा तर तिजसि मानतो रामाविण राज्यपदीं कोण बैसतो वांच्छिति जे पुत्रघात ते कसले मायतात वांच्छिति जे पुत्रघात ते कसले मायतात तुज दिधला शब्द कसा नृपति मोडतो तुज दिधला शब्द कसा नृपति मोडतो रामाविण राज्यपदीं कोण बैसतो लंपट तो विषयिं दंग तुजसि करी वचनभंग लंपट तो विषयिं दंग तुजसि करी वचनभंग भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो रामाविण राज्यपदीं कोण बैसतो घेउनियां खड्ग करीं मीच पाहतो रामाविण राज्यपदीं कोण बैसतो वर दिधलें कैकयीस आठवले या मितीस वर दिधलें कैकयीस आठवले या मितीस आजवरी नृपति कधी बोलला न तो आजवरी नृपति कधी बोलला न तो रामाविण राज्यपदीं कोण बैसतो मत्त मतंगजापरी दैव तुझें चाल करी मत्त मतंगजापरी दैव तुझें चाल करी श्रीरामा मीच त्यास दोर लावितो श्रीरामा मीच त्यास दोर लावितो रामाविण राज्यपदीं कोण बैसतो बैस तूंच राज्यपदीं आड कोण येइ मधीं बैस तूंच राज्यपदीं आड कोण येइ मधीं येउं देत कंठस्‍नान त्यास घालितो येउं देत कंठस्‍नान त्यास घालितो रामाविण राज्यपदीं कोण बैसतो येउं देत तिन्ही लोक घालिन मी त्यांस धाक येउं देत तिन्ही लोक घालिन मी त्यांस धाक पाहूं देच वृद्ध पिता काय योजितो पाहूं देच वृद्ध पिता काय योजितो रामाविण राज्यपदीं कोण बैसतो शत शतके पाळ धरा श्रीरामा चापधरा शत शतके पाळ धरा श्रीरामा चापधरा रक्षणासि पाठीं मी नित्य राहतों रक्षणासि पाठीं मी नित्य राहतों रामाविण राज्यपदीं कोण बैसतो येइल त्या करिन सजा बंधू नच दास तुझा येइल त्या करिन सजा बंधू नच दास तुझा मातुश्री कौसल्येशपथ सांगतो मातुश्री कौसल्येशपथ सांगतो रामाविण राज्यपदीं कोण बैसतो घेउनियां खड्ग करीं मीच पाहतो रामाविण राज्यपदीं कोण बैसतो

Written by: G D MADGULKAR, SUDHIR V PHADKELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs