Majhya Matiche Gayan

अनुराधा पौडवाल

माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी जरा कानोसा देऊन जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे कधी ऐकशील का रे माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी माझी धुळीतील चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी माझी धुळीतील चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी जरा पापणी खोलून जरा पापणी खोलून कधी पाहशील का रे कधी पाहशील का रे कधी ऐकशील का रे माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी माझ्या जहाजाचे पंख मध्यरात्रीत माखले माझ्या जहाजाचे पंख मध्यरात्रीत माखले तुझ्या किनाऱ्यास दिवा तुझ्या किनाऱ्यास दिवा कधी लावशील का रे कधी लावशील का रे कधी ऐकशील का रे माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी माझा रांगडा अंधार मेघामेघांत साचला माझा रांगडा अंधार मेघामेघांत साचला तुझ्या उषेच्या ओठांनी तुझ्या उषेच्या ओठांनी कधी टिपशील का रे कधी टिपशील का रे कधी ऐकशील का रे माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी जरा कानोसा देऊन जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे कधी ऐकशील का रे माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी

Written by: कुसुमाग्रजLyrics © Royalty Network, Peermusic PublishingLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs