Partichya Ya Vatevarti
मिलिंद इंगळे
आआ आआ आआ
परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते
परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते
निघता निघता वाटच वळते
पावलांत घुटमळतेअसेच काही घडते
असेच काही घडते
असेच काही घडते
आआ आआ डोळ्यांमधला ढगा आडचा पाऊस येतो
प्रतिबिंबांचा प्रदेश सगळा अंधुक अंधुक होतो
डोळ्यांमधला ढगा आडचा पाऊस येतो
प्रतिबिंबांचा प्रदेश सगळा अंधुक अंधुक होतो
दूर-दूर पण पुन्हा नव्याने वीज अशीच चमकते
असेच काही घडते
असेच काही घडते
असेच काही घडते
कधी हसरा दुखरा क्षण यावा निघून जावा
कधी हसरा-दुखरा क्षण यावा निघून जावा
कधी अचानक जावे जखमांच्या गावा
लपवून आसू हसरे गाणे मनामनात उमलते
असेच काही घडते
असेच काही घडते
असेच काही घडते
हा रंगांचा शामल हिरवा उजेड आला
हा रंगांचा शामल हिरवा उजेड आला
आणि दिलेला हात कुणाचा उजाड झाला
काटा कोमल होतो आणिक हृदयी फूलच सलते
असेच काही घडते
असेच काही घडते
असेच काही घडते
फुलातला हा गंध कुणाला दिसला नाही
कसा धरावा मुठीत तारा लपला नाही
आभासातून भास फिरावा तसे तसेच उमगते
असेच काही घडते
असेच काही घडते
असेच काही घडते
परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते
निघता-निघता वाटच वळते पावलांत घुटमळते
असेच काही घडते
असेच काही घडते
असेच काही घडते
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now